विजयकुमार पुराणिक ; फैजपूरला भाजपा पेजप्रमुखांचा मेळावा
फैजपूर- येणारी निवडणूक ही देशाचे भवितव्य ठरवणारी आहे. त्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्यांनी मेहनत घेणे गरजेचे आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी हे तर आता भाजपाची कॉपी करण्याचे काम करत असल्याचे मत भाजप प्रदेश संघटनमंत्री विजयकुमार पुराणिक यांनी रावेर लोकसभेच्या पेज प्रमुखांच्या मेळाव्यात व्यक्त केले. सोमवारी यावल रोड वरील सुमंगल लॉनमध्ये सायंकाळी रावेर विधानसभा भारतीय जनता पार्टीचा पेज प्रमुख मेळावा झाला. याप्रसंगी ते बोलत होते.
पराभव दिसत असल्याने परावांची माघार
पुराणिक पुढे म्हणाले की, जाणते राजे यांनी मोठा वाजा-गाजा करीत डरकाळ्या फोडत माढातून उमेदवारी करू, अशी गर्जना केली पण भाजपापुढे त्यांचा टिकाव लागणार नाही व पराभव होईल हे चित्र दिसत असल्याने पवार यांनी माघार घेतली, व खेदाची बाब म्हणावी लागेल असेही ते म्हणाले.
यांची व्यासपीठावर उपस्थिती
व्यासपीठावर माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे, खासदार रक्षा खडसे, आमदार हरीभाऊ जावळे, आमदार चैनसुख संचेती, बेटी पढाव बेटी बचावचे राष्ट्रीय संयोजक डॉ.राजेंद्र फडके, उत्तर महाराष्ट्र संघटन मंत्री किशोर काळकर, जेडीसीसी बँक अध्यक्ष अॅड.रोहिणी खडसे-खेवलकर, जिल्हा परीषद उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, जिल्हा संघटन सरचिटणीस डॉ.सुनील नेवे, लोकसभा विस्तारक हर्षल पाटील, जिल्हा दूध संघ संचालक हेमराज चौधरी, माजी नगराध्यक्ष बी.के.चौधरी यासह मान्यवर उपस्थित होते.
मोदींना पाच वर्षात जमले विरोधकांना 60 वर्षात का नाही जमले -एकनाथराव खडसे
माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे म्हणाले की, 50- 60 वर्षाच्या कालखंडात देशाचा विकास हा खुंटला होता. तो विकास पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाच वर्षात करून दाखवला. पुलवामा हल्ल्यात आपले 40 जवान शहीद झाले होते. त्या जवानांचे बलिदान व्यर्थ न जात मोदी यांनी आठ दिवसात सर्जिकल स्ट्राईक करून 300 दहशतवादी मारले. पंतप्रधान मोदींना पाच वर्षात हे जमले मग 60 वर्ष ज्यांनी राज्य केले त्यांना का नाही जमले? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. रक्षा खडसे यांना पाच लाखांचे मताधिक्य आपण देणार असून ज्यासाठी पेज प्रमुखांनी प्रत्येक घरोघरी जाऊन सरकारची कामे पोहोचवण्याचे आवाहन त्यांनी करीत देशाची सुरक्षा हे तुमच्या मतदानातून ठरणार असल्याचे ते म्हणाले.
विकासकामांच्या जोरावर मतदारांना सामोरे जाणार -रक्षा खडसे
खासदार रक्षा खडसे म्हणाल्या की, पाच वर्षात जो तुम्ही सर्वांनी माझ्यावर विश्वास दाखवला तोच विश्वास आता परत माझ्यावर दाखवा. येणारी निवडणूक ही सोपी आहे, असे समजू नका, उमेदवार कुणीही असो. मेहनत आपल्या घ्यावी लागणार आहे. प्रत्येक गावात कुठे ना कुठे आपली विकासकामे झाले आहेत त्याच विकासावर अपल्याला मते मागायची असल्याचे त्या म्हणाल्या. आमदार हरीभाऊ जावळे म्हणाले की, 23 एप्रिल रोजी आपल्या देशाचे भवितव्य ठरणारी निवडणूक असून त्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्यांनी गाफील न राहता एक महिना कामाला लागावे लागेल. आपल्या भागातील सर्वात मोठा प्रकल्प मेगा रीचार्ज हा असणार आहे त्यामुळे जमिनीत पाणी उपलब्ध असणार असून येत्या पाच महिन्यात त्या प्रकल्पाचे भूमिपूजनदेखील होणार असल्याचे ते म्हणाले.
यांची होती उपस्थिती
व्यासपीठावर जि.प.चे माजी सभापती सुरेश धनके, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, माजी जिल्हा उपाध्यक्ष हिरालाल चौधरी, डॉ.मिलिंद वायकोळे, यावल तालुकाध्यक्ष डॉ.नरेंद्र कोल्हे, रावेर तालुकाध्यक्ष सुनील पाटील, यावल पंचायत समिती सभापती पल्लवी चौधरी, रावेर पंचायत समिती सभापती माधुरी नेमाडे, फैजपूर नगराध्यक्ष महानंदा होले, सावदा नगराध्यक्ष अनिता येवले, जिल्हा बँक संचालक गणेश नेहेते, तालुका सरचिटणीस उज्जैनसिंग राजपूत, जिल्हा परीषद, पंचायत समिती सदस्य, भाजपा पदाधिकारी आणि पेज प्रमुख उपस्थित होते. मेळाव्यात आढावा जिल्हा संघटन सरचिटणीस डॉ.सुनील नेवे यांनी घेतला. प्रास्ताविक हर्षल पाटील तर सूत्रसंचलन वासुदेव नरवाडे तसेच आभार विलास चौधरी यांनी मानले.