माणसाने समाजकार्य केले पाहिजे : दिलीप मोहिते

0

श्री समर्थ स्कूलचे शाखा उद्घाटन समारंभ

चिंबळी : राजकारणात नाव कमवून प्रतिष्ठा मिळत असते. मात्र कमावलेले नाव टिकवता येत नाही. पण समाजामध्ये राहून समाजकार्य केले तर नावलौकीक राहून प्राणप्रतिष्ठा व मानमर्यादा राहते. त्यासाठी माणसाने नेहमी समाजकार्य केले पाहिजे, असे मत माजी आमदार दिलीप मोहिते यांनी केळगांव येथे व्यक्त केले. येथील श्री समर्थ शिक्षण प्रसारक मंडळ मोई संचालित श्री समर्थ इंग्लिश मिडियम स्कुलच्या चौथ्या शाखेचे उद्घाटन समारंभात ते बोलत होते. यावेळी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे महापौर नितिन काळजे उपस्थित होते.

श्री समर्थ स्कूलचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी गवारे, संस्थापक संभाजी गवारे, कार्याध्यक्ष विद्या गवारे, उद्योजक विकास गुंड, रोहिदास तापकीर, प्रतिभा गोगावले, अनुराधा गवारे, नामदेव मुंगसे, लक्ष्मीबाई मुंगसे, मुक्ताबाई मुंगसे, पांडुरंग मुंगसे, अरूणा फलके, एकनाथ कर्पे, विक्रम जैद, संतोष गुंड, किरण गवारे, प्राजक्ता घुडंरे, युवराज वहिले, बाळासाहेब गुंड, बबन वीरकर, नवनाथ मुंगसे, संदिप म्हस्के, रामभाऊ गुंड, दीपक मुसळे, काळराम गुंड, विलास वीरकर, संदीप गुंड तसेच शिक्षक, कर्मचारी आदी उपस्थित होते.

शाळांसाठी मदत करणार
मोहिते पुढे म्हणाले की, मुलांना लहानपणीच इंग्रजीचे ज्ञान प्राप्त झाले पाहिजे. त्यासाठी पालकवर्ग आता आपल्या मुलांना प्राथमिक शाळेत न पाटविता इंग्रजी शाळेत दाखल करत आहेत. त्यामुळे काही भागात जिल्हा परिषद शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आल्या आहेत. तसेच खेड तालुक्यात ज्या भागात इंग्लिश स्कुलसाठी लागणारी मदत करणार आहे. कारण मराठी शाळेपेक्षा इंग्लिश मिडियममध्ये मुलांना ज्ञान लवकर प्राप्त होत आहे. कार्यक्रमाचे प्रास्तविक प्राचार्या अनिता टिळेकर यांनी केले, तर आभार शिवाजी गवारे यांनी केले.