वरणगाव- केवलाई फाउंडेशन, पाचोरा या स्वयंसेवी संस्थेने माणसापासुन माणसापर्यत या कार्यक्रमात हतनूर शिवारातील गोसावी व पारधी वस्तीत कपडे वाटप करून समाजापुढे आदर्श उभा केला आहे. वरणगाव फॅक्टरी परीसरातुन जुने कपडे जमा करून त्यांना स्वच्छ करून गरजू व्यक्ती पर्यत पोहचविण्याचे काम ही संस्था करते. साड्या, शर्ट, पॅण्ट, स्वेटर, लहान मुलांचे कपडे जमा करून केवलाई फाउंडेशनचे उपाध्यक्ष अशोक पाटील, राहुल पाटील, रवी पाटील, नरेंद्र पवार, पत्रकार मनोहर लोणे आदींनी हा उपक्रम राबविला. गरीबांचीही दिवाळी आनंदात साजरी व्हावी व जुने कपडे फेकुन न देता त्याचा कोणासाठी तरी उपयोग व्हावा, असा हा संस्थेचा उद्देश आहे. वरणगाव परीरसरात या कार्याचे कौतुक होत आहे.