माणुसकी आणि बंधुभावातच नांदते खरी समृध्दी

0

यावल। शांती, प्रेम, बंधुभाव अंगी असलेली माणसं माणुसकी आणि नम्रतेने वागतात. तेच खरे श्रीमंत असतात. अशी बंधुभाव असणारी श्रीमंती जेथे असते तेथेच खर्‍या अर्थाने समृद्धी नांदते, असे माजी आमदार शिरिष चौधरी यांनी सांगितले. सोमवारी यावलमध्ये काँग्रेसकडून आयोजित ईद मिलन कार्यक्रमात ते बोलत होते.

सोमवारी सायंकाळी वाजता शेतकी संघात हा कार्यक्रम झाला. माजी आमदार शिरीष चौधरी अध्यक्षस्थानी होते. कार्यक्रमात सर्वधर्मीय बांधवांना एकत्र करून एकात्मतेचा संदेश देण्यात आला. मसाकाचे चेअरमन शरद महाजन, प्राचार्य डॉ.एफ.एन. महाजन, जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर सोनवणे, भगतसिंग पाटील, पंचायत समितीचे उपसभापती उमाकांत पाटील, पोलिस निरीक्षक बळीराम हिरे, हाजी शब्बीर खान यांनी विचार मांडले. उपनगराध्यक्ष प्रा.मुकेश येवले, पंचायत समिती सदस्य शेखर पाटील, सरफराज तडवी, नगरसेवक स.युनूस, शेख असलम आदी उपस्थित होते.