मातंग एकता आंदोलन संघटनेची कार्यकारिणी जाहीर

0

पिंपरी चिंचवड ः पिंपरी चिंचवड मातंग एकता आंदोलन संघटनेची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. त्यामध्ये, पिंपरी चिंचवड शहराध्यक्षपदी दत्तु चव्हाण तर महिला अध्यक्षपदी आशा शहाणे यांची यांची निवड झाली आहे. तसेच, मातंग एकता आंदोलन युवक आघाडीच्या अध्यक्षपदी विशाल कसबे यांची निवड करण्यात आली.

पिंपरीत मातंग एकता आंदोलन या संघटनेचा शहरातील सर्व कार्यकर्त्यांचा मेळावा नुकताच पार पडला. यावेळी, शहराची कार्यकारणी जाहीर करण्यात आली. तसेच शहर कार्याध्यक्ष पदी मोहन वाघमारे, सचिव- सतिश भवाळ, सरचिटणीस – दशरथ सकट यांची निवड करण्यात आली. प्रसंगी, जम्मू काश्मिर येथील पुलवामा शहिद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी संदिपान झोंबाडे, किशोर धगाटे, भगवान शिंदे, नाना कसबे, हिरामण खवळे, संदिप जाधव, जगन्नाथ आल्हाट, राजू आवळे, बाळासाहेब खंदारे, विठ्ठल कळसे, दत्ता थोरात, कैलास पाठोळे, शेषराव कसबे, राजू धुरंधरे, सुनिल भिसे, बाळासाहेब पाठोळे, श्रावण बगाडे, बापुसाहेब वाघमारे आदी उपस्थित होते.