मातंग समाजाला जागृत करण्यासाठी संवाद यात्रा

0

जळगाव। अण्णाभाऊ साठे जंयतीनिमित्त वाटेगाव ते चिरागनगर पर्यंत 1 ते 31 ऑगस्टदरम्यान यात्रा काढण्यात आली आहे. ही संवाद यात्रा 11 ऑगस्ट रोजी जळगावात दाखल झाली आहे. मातंग समाजात शिक्षण, आरोग्य आणि समाज प्रबोधन या मुद्यावर जागृती करण्यात येत आहे. दररोज वाड्या, वस्त्यांवर किमान 6 सभा घेमिरवणुकीच्या माध्यमातून मुल पहिलीच्या शाळेत घाला, आरोग्य, शिक्षण आणि बचत गटांमध्ये पुढाकार, आर्मी, पोलीस भरती, एसआरपी भरतीसाठी मुले तयार ठेवा शिक्षणाकडे विशेष लक्ष द्या, याबाबत जनजागृती करण्यात येत असल्याचे बहुजन रयत परिषदेचे लक्ष्मणराव ढोबळे यांनी पत्रपरिषदेत सांगितले.

या आहेत मागण्या
शेतकर्‍यांप्रमाणे मागासवर्गीय महामंडळाची कर्जे देखील माफ करावी, अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा, अनूसुचित जातींमध्ये भटक्या विमुक्तांप्रमाणे अ,ब,क,ड वर्गवारी जारी करावी, अनुसुचित जातीमध्ये 65 लाख संख्या असलेल्या बौद्ध समाजाला अ वर्ग, 23 लाख असलेल्या मातंग समाजाला ’ब’ वर्ग द्यावा, मोची, होलार यासह इतर जातींना क वर्ग आणि इतर 52 जातींचा ’ड’ वर्गात समावेश करण्याची मागणी प्रा. ढोबळे यांनी यावेळी केली.

कार्यकर्त्यांची बैठक
यावेळी राजस कोतवाल, मोहन चव्हाण,रविंद्र वाकळे, ज्ञानेश्वर सुरवाडे, स्वप्निल सपकाळे उपस्थित होते. जळगावात दाखल झालेल्या संवाद यात्रेत प्रा. लक्ष्मणराव ढोबळे यांनी अजिंठा विश्रामगृहात जिल्ह्यातील मातंग समाजाच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेतली. या बैठकीमध्ये समाज संघटन, प्रबोधन, शिक्षण, आरोग्य या विषयासंर्दभात चर्चा करण्यात आली. संवाद यात्रेतील पुढील टप्प्यातील कार्यक्रमाची या बैठकीत रूपरेषा सांगण्यात आली.

समाजात मतभेद नसाव
राज्यात दलित समाजाची लोकसंख्या 1 कोटी 30 लाख आहे. राज्यभरात एकट्या मातंग समाजात 300 संघटना असून दलित समाजातील प्रमुख 5 पोटजातीमध्ये अशीच मतभेदाची दारूण अवस्था आहे. गावात बौद्धांची चार घर असली तरी गाव दचकून राहत. मातंग समाजाला मात्र गृहित धरल जात. नोकरी, धंदा, आरक्षणाला सवलत हवी असेल तर बौद्धांच किंवा बौद्ध धर्माच्या लोकांच अनुकरण करा, असा समाजबांधवांना सल्ला असल्याचे त्यांनी सांगितले. शासनाने शेतकर्‍यांची कर्जे माफ केली परंतू शेतकर्‍यांच्या शेतात राबणार्‍या मजुर, मागासवर्गीय समाजाचा विचार केला नाही असा आरोप त्यांनी केले. त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना मतभेद विसरु कार्य करण्याचे आवाहन केले.े