मातंग समाजासाठी पाचशे कोटींचे पॅकेज द्यावे – हनुमंत साठे

0
पुणे : मातंग समाजातील तरुण व्यावसायिकांसाठी राज्य सरकारने पाचशे कोटींचे विशेष पॅकेज द्यावे , अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे मातंग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष हनुमंत साठे यांनी केली आहे.
सरकारने पॅकेज द्यावे यासाठी धरणे, मोर्चे आदी मार्गाने आंदोलन केले जाईल असा इशारा साठे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिला. यावेळी राजू धडे, आनंद वैराट, सुनिल शिंदे, धीरज सकट, संदीप गायकवाड, दीपक फासगे, लखन जाधव, सुषमा कांबळे, कैलास अवचिते, सुनिल जाधव आदी विविध संस्था, संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
शासनाने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची निर्मिती चार वर्षांपूर्वी केली. मात्र अर्थसाह्य देण्यात महामंडळ कमी पडले आहे याची खंत आहे. कुक्कुटपालन, दूध व्यवसाय यासाठी अर्थसाह्याची गरज आहे. सामाजिक न्याय मंत्र्यांच्या योजना कागदावरच राहिल्या आहेत, असे साठे यांनी सांगितले. मातंग समाजासाठी एक लाख थेट कर्जवाटप योजना महामंडळाने राबवावी अशी मागणी साठे यांनी केली आहे.