मातंग समाज उपाध्यक्षांना अपमानकारक वागणुकीची तक्रार

0

बोदवड । मातंग समाजाचे कार्यकर्ते व विदर्भ खान्देश मातंग सेवा संघाचे उपाध्यक्ष संजय बोदडे यांना ३० रोजी नायब तहसीलदार तथा पुरवठा निरीक्षक पाटील यांनी कार्यालयात अपमानकारक वागणूक दिल्याचा आरोप असून बोदडे यांनी जिल्हाधिकारी व पोलीस निरीक्षकांना निवेदन देत अ‍ॅट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. बोदडे हे ३० ऑगस्ट रोजी समाजाच्या एका महिलेच्या कामानिमित्त गेले असता त्यांना तहसीलदार कार्यालयातील नायब तहसीलदार तथा पुरवठा निरीक्षक के.एम. पाटील यांनी अर्वाच्य भाषा वापरल्याचा आरोप आहे. पाटील यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा अन्यथा मी तहसील कार्यालयासमोर डफ वाजवून आमरण उपोषणास बसेल, असे निवेदन संजय बोदडे यांनी जिल्हाधिकारी, पोलीस निरीक्षक बोदवड यांना दिले आहे.

आपण कुणालाही जातीवाचक बोललेला नाही वा कुणाचाही अपमानही केलेला नाही. आपल्यावर करण्यात आलेले आरोप बिनबुडाचे व तथ्यहिन आहेत. –  के. एम. पाटील, पुरवठा निरीक्षक