दोंडाईचा । ज्या आई-वडिलांनी जन्म दिला त्यांच्या चरणातच खरे सार्मथ्य आहे. माता पित्यांना वंदन करणे ही जगातली सर्वांत मोठी पुजा आहे. आज वंशाच्या दिव्याच्या नावाखाली सगळेच पोटातील कळ्या खुळायला निघाले आहेत. पण ह्या पुथ्वीवर स्त्रीच अस्तीत्व राहीले नाही तर पुढे जग कसे चालायचे.
घरातील शिकलेली स्त्री संपुर्ण कुटूंबाला पुढे नेते. मुलांचे खरे संगोपण आईच करते. आजच्या धावपळीच्या युगात वडीलांना मुलांशी बोलायला त्यांना मार्गदर्शन करायला वेळ नाही. मुलाला शाळेत घातले म्हणजे आपली जबाबदारी संपली असे पालकांना वाटते. असे प्रतिपादन माजी आमदार बापूसाहेब रावल यांनी पालक शिक्षक मेळाव्यात अध्यक्षीय भाषणात केले. दोंडाईचा ता.शिंदखेडा येथील स्वामी विवेकानंद इंग्लिश मिडीयम स्कुल च्या वतीने दादासाहेब रावल स्टेडियम हॉल येथे पालक शिक्षक मेळावा पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्कुलचे चेअरमन तथा माजी आमदार बापूसाहेब रावल तर प्रमुख पाहुणे संस्थेच्या सचिव शिप्रा रावल व व्यासपीठावर प्राचार्या सुरेखा राजपूत, मुमताज बोहरी, अनिता जयसिंगाणी, पालक शिक्षक सहविचार सभेचे नवविर्वाचित सदस्य प्रविण चौधरी, हरेष कुकरेजा, कालु खाटीक, वैशाली गिरासे, श्रध्दा शर्मा उपस्थित होते.