पिंपरी :- अग्रवाल समाज फेडरेशनच्यावतीने जागतिक महिला दिनानिमित्ताने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या अगरवाल समाजातील महिलांना माता माधवी, अग्र-नारी गौरी पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.
यावेळी आयकर विभागाच्या संयुक्त आयुक्त श्रीमती सुधा गुप्ता, दिल्ली जल बोर्डाच्या माजी उपाध्यक्षा रोशनी बंसल, पुणे महानगरपालिकेच्या नगरसेविका मानसीताई देशपांडे, फेडरेशनचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, उपाध्यक्ष विनोद बंसल, सांस्कृतिक विभाग प्रमुख सुधीरकुमार अगरवाल, महेन्द्र पाटोदिया, विजय मित्तल, रमेश गुप्ता, राजेश मित्तल, पवन बंसल, संजय अग्रवाल, रतन गोयल, राहुल अग्रवाल, भगीरथ बंसल, अशोक अग्रवाल उपस्थित होते. गीता गोयल यांना जीवनगौरव तर हेमलता अगरवाल यांना आदर्श माता पुरस्कार प्रदान केला.
तसेच आदर्श गृहिणी यांना सुधा महेंद्र पाटोदिया, वैद्यकीय डॉ. मीनू संजय अग्रवाल, सामाजिक कार्य उर्मिला पुरुषोत्तम अग्रवाल, नेतृत्व नैपुण्य प्रियवंदा अग्रवाल, सांस्कृतिक उषा तुलशान, विपश्यना व स्वास्थ्य दिप्ती अग्रवाल, राजकीय शितल सावंत-अग्रवाल, व्यावसायिक सोनिया गुप्ता, शैक्षणिक डॉ. मिना सुभाष गोयल, पत्रकारिता रुजुता जालाण, क्रीडा मेघा सुनील गोयल यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. सूत्रसंचालन नीता अग्रवाल व आशुतोष अग्रवाल यांनी केले. आभार अनिल मित्तल यांनी मानले.