भोकरी शिवारातील दुर्घटना ; दोन जण जखमी
मुक्ताईनगर:- मातीचे खोदकाम सुरू असतानाच अचानक मातीची दरड अंगावर कोसळल्याने दोन मजुरांचा जागीच करुण अंत झाला तर दोन जण जखमी झाल्याची घटना सोमवारी पहाटे तालुक्यातील भोकरी शिवारातील तापी काठावर घडली. या घटनेत चिंतामण देविदास म्हसाने (30) व दीपक दगडू म्हसाने (22, दोघे रा. वरोली, ता.जिल्हा बर्हाणपूर) हे जागीच ठार झाले तर मनोज गणेश सोनवणे (वय 20) व गजानन जाधव (वय 20) हे दोघे जखमी झाले.
भोकरी शिवारातील मातीच्या बरडातून माती खोदकाम करणाजया मजुरांनी सोमवारी पहाटे माती काढून ट्रॅक्टर भरला. शेवटच्या क्षणात घमेले फावडे उचलण्यास मजूर गेले असता अचानक मातीची दरड त्यांच्या अंगावर पडली. यात माती खाली दाबले जाऊन दोघे जागीच ठार झाले तर अन्य दोघे जखमी झाले. जखमींवर मुक्ताईनगर उप जिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले आहे. गजानन वासुदेव जाधव (रा. वरोली ता. जिल्हा बजहाणपूर) यांच्या खबरीवरून अकस्मात मृत्यचीू नोंद करण्यात आली.