रावेर : मातीची वाहतूक करणारे ट्रॅक्टर-टॉली शनिवारी रावेर महसूल पथकाने जप्त करीत ते सावदा पोलिस स्टेशनला जमा करण्यात आले आहे. अवैधरीत्या गौण खनिजाची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकाने गाते ते सावदा रस्तावरून मातीची वाहतूक करणारे ट्रॅक्टर व ट्रॉली ताब्यात घेत ते कारवाईसाठी सावदा पोलिस ठाण्याच्या आवारात जमा केले आहे. ही कारवाई खिरोदा मंडळ अधिकारी, खिर्डी मंडळ अधिकार, सावदा तलाठी, कोचुर बु.॥ तलाठी, बलवाडी तलाठी, चिनावल तलाठी, रायपूर तलाठी, उदळी तलाठी, कांडवेल तलाठी, वाघोदा तलाठी, दसनूर तलाठी व रायपूर कोतवाल आदींनी केली. दरम्यान, 10 फेब्रुवारी रोजी दंड न घेता ट्रॅक्टर सोपडल्याने महसूल प्रशासनावर टिकेची झोड उठली होती तर प्रांताधिकारी कैलास कडलक यांच्याकडे दिलेल्या खुलाशात संबंधितांनी त्या ट्रॅक्टर-टॉलीमध्ये देखील माती असल्याचे सांगून प्रकरणाची सावरासावर केल्यानंतर शनिवारी मात्र माती असलेले वाहन जप्त करण्यात आले.