मातीच्या ढिगार्‍याखाली दबून मजुराचा मृत्यू

0

जळगाव । एरंडोल तालुक्यातील पिंपळकोठा येथील रवींद्र अशोक अहिरे (वय 32) या मजुराचा मातीच्या ढिगार्‍याखाली दबून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना निमखेडी शिवारात सकाळी 9 वाजेच्या सुमारास घडली. या घटनेत एकनाथ अर्जुन साळुंखे (वय 32) व रमेश साळुंखे (वय 30) हे दोघं मजुर किरकोळ जखमी झाले आहेत. जिल्हा सामान्य रूग्णालयात मात्र मुलाचा मृतदेह पाहून आई-वडीलांनी मनहेलवणारा आक्रोश केला होता. त्यातच रूग्णालय परिसरात नातेवाईकांसह मजुरांची चांगलीच गर्दी जमली होती. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडालेली पहावयास मिळाली. दरम्यान, याप्रकरणी तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.