पालघर (संतोष पाटील) “आनंदी ऑगस्ट” अंतर्गत कुपोषण निर्मुलानाकरिता राज्य आरोग्य आणि कुटुंब कल्याण कार्यालय, पुणे आणि आरोग्य विभाग, जिल्हा परिषद पालघर अंतर्गत “मातृत्व आरोग्य आणि बाल आरोग्य” या विषयांवर वैदकीय आधकारी यांची कार्यशाळा दि. २ ऑगस्ट २०१७ रोजी संकुल सभागृह, पालघर येथे आयोजित करण्यात आली होती. सदर कार्यशाळेत मा. श्री. सुरेश तारे, सभापती, बांधकाम व आरोग्य समिती, मा. श्रीम. निधी चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी, डॉ. मंढे, उपसंचालक, मुंबई मंडळ ठाणे, श्री.डॉ. संतोष गायकवाड, जिल्हा आरोग्य अधिकारी आदि मान्यवर उपस्थित होते. डॉ. कर्नाटकी सर, युनिसेफ समन्वयक, डॉ. अपर्णा श्रोत्री, स्त्रीरोगतज्ज्ञ, बी.जे. मेडिकल कॉलेज, पुणे, डॉ. उदानी, बालरोगतज्ञ, के.इ.एम. रुग्णालय, मुंबई व डॉ. साधना राऊत, बालरोगतज्ञ, बी.जे. मेडिकल कॉलेज, पुणे या तज्ज्ञमार्फत उपस्थिताना मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यशाळेत मातृत्व आरोग्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण असलेल्या बाबी जसे गरोधर मातांची नोंदणी १२ आठवड्याच्या आत करणे, गरोधरपानामध्ये किमान ४ तपासण्या प्राथमिक आरोग्य केंद्र/ उपकेंद्रा मध्ये वैदकीय अधिकारी व आरोग्य सेविका मार्फत करणे तसेच EDD/EPD नुसार मातांना संस्थेत प्रसूती साठी प्रवृत्त करणे जेणेकरून मातामृत्यू होणार नाही . ० ते १ वर्ष वयोगटातील बालकांची काळजी तसेच ० ते २९ दिवसांमध्ये नवजात शिशुमधील मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी उपयोजना तसेच बालकांचे वेळेत लसीकरण करणे इत्यादी महत्व पूर्ण विषयांवर तत्ज्ञान मार्फत मार्गदर्शन करण्यात आले. जिल्ह्यात कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी सर्व आरोग्य यंत्रणेने सतर्कतेने काम करून येत्या काळात आतीदाक्ष्तेने सर्व गरोधर माता आणि बालकांना नयमित काळजीपूर्वक औषोधउपचार देण्यात यावे आसे आव्हान मा. श्री. सुरेश तारे, सभापती, बांधकाम व आरोग्य समिती यांनी या वेळी केले. तसेच सर्व वैदकीय अधिकारी आणि कर्मचारी यांनी एकत्र येऊन“team work” ने कुपोषण निर्मुलांच्या कार्यक्रमात सहकार्य करावे आसे मत मा. श्रीम. निधी चौधरी यांनी यावेळी वक्त केले.