वंचित घटकांच्या मुलांसाठी भरते शाळा
चिंचवड : मराठी राज्यभाषादिनाचे औचित्य साधून मातृसेवा विद्यामंदिर शाळेने चौदावे स्नेहसंमेलन नुकतेच साजरे करण्यात आले. ही शाळा विनाअनुदानित असून मुलांना मोफत शिक्षण, मोफत साहित्य व दुपारचे सकस आहारपण दिला जातो. ही शाळा तळा-गाळातील, झोपडप÷÷ट्टी, मजुर वर्गाच्या तसेच शिक्षणापासून वंचित घटकांच्या मुलांसाठी चालविण्यात येत आहे. शासानाने या शाळेचा गौरव केला आहे. स्नेह संमेलनाला भाऊ ÷अभ्यंकर, नगरसेविका संगिताताई भोंडवे, दामाजी आसबे, जानकीदेवी बजाज ग्रामविकास संस्थेच्या सोनिका शहा, मुखर्जीसर, पी.एम. शहा फाउंडेशनचे अॅड. चेतन गांधी, वर्धमान प्रतिष्ठिानचे अध्यक्ष विलास राठोड आदी उपस्थित होते.
युनिसेफच्या घोषणेतून प्रेरणा मिळाली
आपल्या प्रास्तविक भाषणामध्ये संस्थेचे अध्यक्ष भागचंद ब्रम्हेचा म्हणाले की, ज्ञान प्रबोधिनी संस्थापक भाऊसाहेब अभ्यंकरांच्या प्रेरणेने ही शाळा सुरू केली आहे. एक नवीन संकल्पना पंचकोश विकसन, गुरूकुल पद्धती व मार्गदर्शनाने कार्य सुरू आहे. वंचित निराधार मुलांना बरोबर घेऊन जग बदलूया या युनिसेफच्या घोषणेतून प्रेरणा मिळाली आहे. हा यज्ञ असून त्यात आमचा खारीचा वाटा आहे. स्नेहसंमेलनातून विद्यार्थ्यांनी नृत्य तसेच साहित्यातील नवरसांचा अविष्कार गायनातून सादर केला. तसेच मुलांनी अतिशय अवघड योगासनांची प्रात्यक्षिके सादर केली. त्यामुळे उपस्थित सर्व पाहुणे भाराऊन गेले.
वसुधैव कुटुंबकम
आपले पंतप्रधान मोदिंनी सांगितलेल्या पब्लिक पार्टीसिपेशन या तत्वानुसार हे कार्य चालू आहे. सर्व कार्य समाजातील दानशूर घटक तसेच रोटरी, लायन्स कल्ब, कॉर्पोरेट सेक्टर हे आमचे आधारस्तंभ आहेत. ‘वसुधैव कुटुंबकम’ हे आमच्या ऋषींचे स्वप्न अशा उपक्रमातून साकार होऊ शकते, असा आशावाद भाऊसाहेब अभ्यंकर व नगरसेविका भोंडवे यांनी व्यक्त केला.