मुंबई: विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता युतीबाबत जोरदार हालचाली सुरु झाली आहे. दरम्यान आज युवसेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी युतीबाबत मोठे विधान केले आहे. युती झाल्यानंतर भाजप-शिवसेनेत विश्वासघाताची शंका उपस्थित होत आहे. यावर आदित्य ठाकरे यांनी युतीमध्ये शिवसेना कधीही विश्वासघात करणार नाही असे सांगितले आहे.
आज कोकणात आदित्य ठाकरे यांची जनाशिर्वाद यात्रा आहे. यावेळी ते बोलत होते. जनतेच्या प्रश्नासाठी युतीची सरकार आवश्यक आहे. मात्र युतीबाबत जे काही निर्णय होईल ते मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख यांच्यात होईल, याबाबत मला अधिक सांगता येणार नाही असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मातोश्रीवर शिवसेनेची बैठक सुरु आहे. या बैठकीत उमेदवाराची चाचपणी होणार आहे. त्यामुळे मातोश्रीसमोर इच्छुक उमेदवार आणि समर्थकांची मोठी गर्दी जमली आहे. बैठकीला आमदार, खासदार, विभागप्रमुख, शाखा प्रमुख उपस्थित आहे. भाजपने काल २८८ जागांची चाचपणी केली आहे. त्यानंतर आज शिवसेनेने उमेदवाराची चाचपणी सुरु केली आहे. लोकसभेप्रमाणे विधानसभेला देखील युती होणार असे बोलले जात आहे. मात्र युती नाही झाली तर पुढील वाटचाल कशी करावी याबाबत देखील बैठकीत विचारमंथन सुरु आहे.