मातोश्री रमाबाई ठाकरे प्रसूतिगृहाची अवस्था गंभीर

0

घाटकोपर : पश्चिम साईनाथ नगर रोड येथील मातोश्री रमाबाई ठाकरे प्रसूतिगृहाची आतील अवस्था अत्यन्त गंभीर असून प्रसूती वा तपासणीसाठी येणार्‍या गरोधर स्त्रियांना आत जपून पाऊल टाकत यावे लागते. या प्रसूतिगृहाच्या इमारतीचे संपूर्ण स्ट्रक्चर धोक्यात असून भिंतीवरील सिमेंट दिवसेंदिवस उकरत आहे. छतावरील सिमेंट निघाल्याने लोखंडी सळ्या दिसत आहेत. प्रसूतिगृहाचे आतील प्रवेश द्वार पूर्ण पणे मोडलेले असून गेटसमोरील लाद्या उकरून गेल्या आहेत. मुंबई महानगर पालिकेने 18 जुलै 1996 साली सर्वसामान्य रुग्नासाठी पालिकेने हे रुग्णालय सुरु केले. गरोधर स्त्रिया नाव नोंदणी व तपासणीसाठी येथे येता .

खिडकीतून पावसाचे पाणी आत
गेल्या दोन वर्षांपासून या रुग्णालयाच्या खिडकीतून पावसाचे पाणी आत शिरत असल्याने आतील प्रसूती विभागात चिखल होत आहे .त्यामुळे प्रवेशद्वारा पासून आत प्रसूतीसाठी येणार्‍या स्त्रियांना पाऊल सावकाश टाकत आत यावे लागते. विभागातील आतील पिलर झिरपत असल्याने त्यांना लोखंडी टेका देण्यात आलेला आहे. लोखंडी टेका देण्यात आलेल्या आसनावर गरोधर स्त्रिया बसायला सुद्धा घाबरत आहेत.

प्रसूतिगृहांच्या आतील मोडकळीस आलेल्या स्ट्रक्चरचे औडीट बांधकाम विभागाचे अधिकारी यांना पाठवले आहे. आमच्याकडून निवेदन सुद्धा देण्यात आलेले आहे.अधिकारी आठवड्यातून चौकशी करिता येतात.
-स्वप्ना देशमुख, मुख्य क्लार्क