मातोश्री वृद्धाश्रमात चिमुकल्यांनी साजरा केला गणेशोत्सव

0

आजी आजोबांसोबत लुटला उत्सवाचा आनंद

जळगाव: आजी आजोबा हे नातवंडांसाठी त्यांचे मित्रच असतात गणेशोत्सवासारख्या भव्य सोहळ्यात त्यांची आठवण करणे हे आपले आद्य कर्तव्य अशाच प्रेरणेने प्रेरित होऊन के.सी.ई. सोसायटी च्या गुरुवर्य प.वि.पाटील विद्यालयाच्या वतीने अण्णासाहेब डॉ.जी.डी. बेंडाळे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त मोतोश्री वृद्धाश्रमात आजी आजोबांसोबत आनंद लुटून गणेशोत्सव साजरा केला. याप्रसंगी वृद्धाश्रमातील आजी आजोबांनी विद्यार्थ्यांना आपले मनोगत सांगितले आणि त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू भरून आले.विद्यार्थ्यांनी त्यांच्यासोबत खूप गप्पा मारल्यात. विद्यालयाकडून आजी आजोबांना जेवण देण्यात आले.

केशव स्मृती प्रतिष्ठान चे सचिव रत्नाकरजी पातील तसेच मातोश्री वृद्धाश्रमाच्या प्रकल्प प्रमुख अनिता कांकरिया यांनी विद्यार्थ्यांच्या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी योगेश भालेराव , कल्पना तायडे , सरला पाटील , दिपाली चौधरी , नेमीचंद झोपे , दिशा गुंठे ,देवेंद्र चौधरी , सुनील नारखेडे, सारिका मेटकर आदींनी परिश्रम घेतले. प्रसंगी मुख्या.रेखा पाटील , संजय काळे , छाया पाठक , मुकुंद देशकर , मनोहर सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते.