रावेर | मात्रान नदी पात्रात दोन अल्पवयीन मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी सायंकाळी साडे पाचच्या सुमारास घडली.
याबाबत वृत्त असे की, मदीना कॉलनीतील शेख इमरान शेख कालू (वय-१५) तर मन्यार वाडातिल रहिवासी शेख आसिम शेख मन्नान (वय- १४) हे आज रविवारची सूटी असल्याने दोघे मित्र पोहण्यासाठी रावेर शहराला लागून असलेली मात्रान नदीत बांधलेल्या बंधाऱ्याच्या जमा असलेल्या पाण्यात पाण्याचा अंदाज न आल्याने बुडुन मृत्यु झाले आहे. दोघेही य ९ वी शिक्षण घेतात त्यांचे वडील मजूरीचे काम करतात दोन दिवसापूर्वी जोरदार पाऊस झाल्याने बंधाऱ्यात पाणी साचले होते दरम्यान घटनेची माहिती मिळताच तहसीलदार विजयकुमार ढगे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, माजी नगराध्यक्ष गोटू शेट उपनगराध्यक्ष अॅड सूरज चौधरी आदिनी येथील ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली आहे.