माथाडी कामगारांतर्फे शरद पवार यांचा सत्कार

0

नवी मुंबई । राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या राजकीय कारकीर्दीस 50 वर्षे पुर्ण झाल्याबद्दल माथाडींचे आराध्यदैवत कै. आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या 84 व्या जयंतीनिमित्त वाशी, नवी मुंबई येथे आयोजित माथाडी कामगारांच्या भव्य मेळाव्यात महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनच्यावतीने सत्कार करण्यात आला.

यावेळी वत्सलाताई अण्णासाहेब पाटील, माथाडी नेते आमदार नरेंद्र अण्णासाहेब पाटील, कार्याध्यक्ष गुलाबराव जगताप, आमदार शशिकांत शिंदे, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, माजी मंत्री गणेश नाईक, संयुक्त सरचिटणीस चंद्रकांत पाटील, नगसेविका भारतीताई पाटील, रविकांत पाटील, एकनाथ जाधव हे उपस्थित होते.