माथेफिरूने फोडले शौचालयावरील 30 लाईट

0

जळगाव। शहरातील पांझरापोळ परिसरात असलेल्या सार्वजनिक शौचालयावरील 30 सीएफएल लाईट (बल्ब) एका माथेफिरूने फोडल्याची घटना रविवारी उघडकीस आली असून याप्रकरणी शनिपेठ पोलिस ठाण्यात मनपा आरोग्य निरिक्षक यांच्या फिर्यादीवरून त्या माथेफिरूविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोग्य निरिक्षकांनी घटनास्थळीची केली पाहणी
मंगळवारी 29 जुलैला सकाळी 6 वाजेच्या पुर्वी मनोज भिमराव धनगर (रा. जोशी पेठ) ह्या तरूणाने पांझरापोळ परिसरात असलेल्या सार्वजनिक शौचालयांच्या बाहेर लावण्यात आलेले 30 सीएफएल लाईट फोडली. हा प्रकार परिसरातील नागरिकांना लक्षात येताच त्यांनी महानगरपालिका आरोग्य विभागाला तसेच शनिपेठ पोलिसांना कळविले.

यानंतर मनपा आरोग्यनिरिक्षक ज्ञानेश्‍वर एकनाथ लोखंडे यांनी घटनास्थळी जावून पाहणी केली. यात त्यांना 30 सीएफएल लाईट फोडल्याचे निषन्न होवून 9 हजार 600 रुपयांचे नुकसान झाल्याचे समोर आले. लोखंडे यांनी घटनास्थळाचा पंचनामा करत शनिपेठ पोलिस ठाण्यात माथेफिरू मनोज भिमराव धनगर या तरूणाविरूध्द तक्रार दाखल केली. त्यावरून मनोज यांच्याविरूध्द शनिपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पूढील तपास सपकाळे हे करीत आहेत.