पत्नीला माहेरी नेल्याचा राग अनावर ; चिंचोली-धानोरा रस्त्यावरील घटना ; चौघे जखमी जण
यावल- पत्नीला माहेरी घेऊन जात असल्याचा राग येऊन माथेफिरू जावयाने पत्नीच्या नातलगांच्या अंगावरच दुचाकी घातल्याची घटना बुधवारी दुपारी चिंचोली गावाजवळ घडली. या अपघातात चार जण जबर जखमी झाले. जखमींना तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चिंचोली ेथील जितेंद्र अशोक कोळी याचं बुधवारी आपल्या पत्नीशी भांडण झालं होतं. तेव्हा त्यांच्या पत्नीने आपल्या माहेरी आडगाव, ता.चोपडा येथे याबाबत कळवले. माहेरहून त्यांचे नातलग जितेंद्र कोळी त्यास समजण्यासाठी आले आल्यांतर जितेंद्रने आलेल्या लोकांचं काहीच ऐकलं नाही तर या सर्व लोकांनी दुपारी यावल पोलीस स्टेशन गाठत झाल्या प्रकारची माहिती दिली. हवालदार विजय चौधरी व विकास सोनवणे यांना घेऊन चिंचोली आले व त्यांनीही जितेंद्रची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. माहेरच्या लोकांनी मुलीस सोबत घेत चोपड्याकडे निघाले मात्र यावेळी जितेंद्रने नातलगांना दूरध्वरी करून रस्त्यातच थांबवले व आपल्या पत्नीचे काही साहित्य राहिले असून मी देण्यात येत असल्याचे सांगत दूरध्वनी कट केला. नातेवाईक चिंचोली ते धानोरा दरम्यानच्या रस्त्यावर थांबले असता सुसाट दुचाकी घेऊन आलेल्या जितेंद्रने उभ्या असलेल्या नातेवाईकांच्या अंगावर वाहन चालवल्याने कमलाकर सपकाळे (भोकर), इंदुबाई गुजर (आडगाव, ता.चोपडा), छोटू मोतीलाल कोळी (रा. विरवाडे) व कैलास अशोक सोनवणे हे चार जण गंभीर जखमी झाले. चौघांना घटनास्थळाहून थेट जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले.