माथेरानची मिनी ट्रेन पुन्हा रुळावर आणण्याच्या हालचालींना वेग

0

माथेरान (चंद्रकांत सुतार) : वर्षभरापासून बंद असलेली माथेरानची मिनी ट्रेन पुन्हा रुळावर आणण्याच्या हालचालींना सर्वच माथेरानकरांकडून सर्वोतोपरीने प्रयत्न होत आहेत. आमदार, खासदार स्थानीक लोकप्रतीनिधिंनी वेळोवेळी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांची भेट घेऊन मिनीट्रेन सुरु करण्यासबंधीचे गार्हाणे मांडले परंतु काही तांत्रीक बदल इंजिन व डब्यांमध्ये करायचे आहेत. सुरक्षीततेच्या उपाय योजणा करायच्या आहेत. असे त्यावेळी सांगण्यात आले. वर्षभरापुर्वी अमनलॉज स्टेशनच्यापुढे मिनी ट्रेनचे डब्बे घसरल्याने सुरक्षीततेच्या कारणास्तव नेरळ-माथेरान मिनीट्रेन सेवा बंद ठेवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला. त्यात अमनलॉज – माथेरान शटलसेवेचा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.

ही सेवा सुरु करण्यासाठी चहुबाजुंनी रेल्वे प्रशासनावर दबाव वाढला आहे. मिनीट्रेनच्या मार्गात सुरक्षीततेच्या उपाय योजणा करुन तीन नवीन इंजिन आणण्यात आली होती. परंतु नवीन इंजिनांची चाचणी दरम्यान त्यामध्ये दोष आढळ्याने मिनीट्रेन रुळावर धावलीच नाही. त्यामूळे रेल्वे प्रशासनाने नेरळ-माथेरान व अमनलाँज-माथेरान शटलसेवा सुरु करणे शक्य नसल्याचे सांगीतले. मिनीट्रेन वर्षभरापासुन बंद असल्याने त्याचा परीणाम इथल्या जन जीवनावर, हॉटेल व्यावसायिक, दुकानदार, घोडेवाले, रीक्षाचालक, लाँजिंगधारक व मोलमजुरांवरांच्या व्यवसायांनवर झाला आहे.

लोकप्रतिनिधींनी घेतला रेल्वे मुख्य महाव्यवस्थापकांची भेट
15 महीने उलटले तरी रेल्वे प्रशासन अधिकृतपणे काहीच सांगत नसल्याने आज माथेरानचे माजी नगराध्यक्ष अजय सावंत, मनोज खेडकर, विवेक चौधरी, माथेरान नगरपरिषदेचे विरोधीपक्ष नेते शिवाजी शिंदे यांनी मध्य रेल्वेचे मुख्य महा व्यवस्थापक डी के शर्मा यांची त्यांच्या मुंबई सीएसएमटी येथील कार्यालयात भेट घेतली. यावेळी त्यांनी आक्टोंबर 2017 पर्यंत अमनलाँज-माथेरान शटलसेवा व नेरळ-माथेरान सेवाही लगेचच सुरु करण्याचे सुतोवाच त्यांनी केले.

आम्ही माथेरान मिनी ट्रेन चालु करण्यासाठी सातत्याने रेल्वे अधिकार्यांशी व रेल्वे मंत्री सुरेश प्रभुंशी भेट घेऊन मिनीट्रेन लवकरात लवकर चालु करण्यासबंधी विनंती केली आहे.
– मनोज खेडकर, माजी नगराध्यक्ष

पावसाळा संपण्यापुर्वी,शटल सेवा, व दिवाळी दरम्यान नेरळ माथेरान सेवा पुर्ववत सुरु करणार
– जी.एम.शर्मा, मध्य रेल्वे मुख्य महाव्यवस्थापक.