माथेरान । माथेरानच्या मुख्य बाजारपेठेच्या ठिकाणी असलेल्या कापडीया मार्केट येथील सुलभ शौचालयाला सुरू होण्यास अद्याप विलंब होत आहे. याचा नाहक त्रास इथल्या व्यापारी वर्गांसह पर्यटकांना सोसावा लागत आहे याकामी कापडीया मार्केटच्या व्यापारी मंडळींनी दि.14 रोजी सदरचे अपूर्णतेच्या खाईत सापडलेल्या सुलभ शौचालयाचे काम तातडीने मार्गी लावावे अन्यथा आम्ही लोकवर्गणीतुन ते पूर्ण करून घेऊ या आशयाचे व्यापार्यांच्या सह्यांचे लेखी निवेदन मुख्याधिकारी डॉ.सागर घोलप यांना सादर केले. यावेळी कापडीया मार्केटचे अध्यक्ष मंगेश शिंदे, माथेरान नागरी पतसंस्थेचे संचालक हेमंत पवार, मनोज चव्हाण, विठ्ठलराव पवार, भास्करराव शिंदे यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते.
व्यापारीवर्गांसह पर्यटकांना त्रास
सुलभ शौचालय पूर्णत्वास गेलेले नसल्याने याचा त्रास दुकानदार, पर्यटकांना सहन करावा लागत आहे. याकामी हे काम जर नगरपालिका पुर्ण करीत नसेल तर आम्ही लोकवर्गणीतून हे काम पुर्ण करून घेऊ असे या निवेदनात कापडीया मार्केटमधील व्यापारी वर्गाने नमुद केले आहे.
या शौचालयाचे अपूर्ण काम दिवाळी पूर्वी पुर्ण केले जाईल त्याबाबत आम्ही संबंधीत ठेकेदाराला सुचना दिल्या आहेत.- डॉ.सागर घोलप,
– मुख्याधिकारी माथेरान नगरपालिका
हे शौचालय चांगल्या दर्जाचे बनविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. 30ऑक्टोबर पर्यंत हे शौचालय लोकार्पण
करण्यात येईल.
– प्रसाद सावंत – गटनेते, माथेरान नगरपालिका