माथेरान । माथेरान मिनिट्रेन रेल्वे रुळांच्या दुरुस्तीचे काम अंतिम टप्प्यावर आलेले आहे त्यामुळे स्थानिकांसह पर्यटकांना ज्या मिनिट्रेनची ओढ आहे ती लवकरच रूळावर येणार असल्याने सर्वांमध्ये सध्यातरी आनंदाचे वातावरण दिसत आहे. मिनिट्रेनच्या माध्यमातून पर्यटक नियमितपणे येत असतात त्यामुळे सर्वांच्या उत्पन्नाची खरी दिशा आणि सर्वस्वी मदार अवलंबून आहे. ही सेवा सुरू व्हावी यासाठी पाठपुरावा केला. अनेकांना ट्रेनने येणार्या पर्यटकांमुळे रोजगार उपलब्ध होत आहे.
मागील वर्षी किरकोळ अडचणींमुळे ही सेवा बंद करण्यात आल्यावर स्थानिकांसह पर्यटकांना अनेक अडचणींवर मात करताना अत्यंत त्रासदायक बनले होते. ही सेवा पूर्ववत सुरू व्हावी यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यानुसार रेल्वेच्या कामाला गती प्राप्त झालेली असून हे काम अंतिम टप्प्यावर आले आहे. ऑक्टोबर महिन्यात ही रेल्वे सेवा सुरळीत सुरू होईल, असे रेल्वेच्या सूत्रांकडून बोलले जात आहे.
वारंवार आम्ही शासन दरबारी मावळचे खासदार श्रीरंग बारणेे यांच्यासह भेटी घेतलेल्या आहेत. एकंदरीतच रेल्वेच्या दुरुस्तीची कामे युद्धपातळींवर सुरू असल्याने अल्पावधीतच ही सेवा सुरू होण्याची चिन्हे दिसत आहेत.
– प्रसाद सावंत
विद्यमान नगरसेवक माथेरान नगरपालिका
ट्रेन बंद असल्यामुळे आम्हाला दस्तुरीपासून तीन किलोमीटर पायपीट करून केवळ माथेरानवर असलेल्या निस्सीम प्रेमापोटी पायी यावे लागत आहे. लवकरच ही सेवा सुरू व्हावी आणि पुन्हा नव्या जोमाने या ट्रेनचा आनंद उपभोगता यावा ही अपेक्षा.
– नीलकंठ मंडलिक
पर्यटक मुंबई