मादाम तुसाँ म्युझियममध्ये कर्णधार विराटची वर्णी लागणार

0

नवी दिल्ली । भारताचा वेगवान फलंदाज आणि कर्णधार विराट कोहलीच्या चाहत्यांसाठी खूशखबर आहे. कारण मादाम तुसाँ म्युझियममध्ये आता कोहलीचा मेणाचा पुतळा बनवण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मादाम तुसाँ म्युझियमचे एक शिष्टमंडळ काही दिवसांपूर्वी कोहलीला भेटायला आले होते. यावेळी त्यांनी कोहलीच्या शरीराचे माप घेतले आहे. त्याचबरोबर त्याची हेअरस्टाईल आणि कपड्यांचीही त्यांनी माहिती घेतली आहे. मादाम तुसाँ म्युझियममध्ये होणार्‍या आपल्या पुतळ्याबद्दल कोहलीने, ही माझ्यासाठी फार मोठी बाब आहे.

मी मादाम तुसाँ म्युझियमच्या व्यवस्थापनाचे आभार मानू इच्छितो, कारण त्यांनी मला हा सन्मान दिला. ही आठवण माझ्यासाठी अविस्मरणीय अशीच असेल. असे म्हटले. दरम्यान, कोहलीने 12 वर्षांपूर्वी भारताला 19-वर्षांखालील विश्‍वचषक जिंकवून दिला होता. त्यानंतर भारताच्या पुरुष संघाचे नेतृत्वही त्याच्याकडेच सोपवण्यात आले आहे. कोहलीला पद्म आणि अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे, त्याचबरोबर त्याला आयसीसी आणि बीसीसीआयने पुरस्कार दिले आहेत. त्याच्या याच कामगिरीमुळे मादाम तुसाँ म्युझियममध्ये दिग्गज मंडळींच्या पंक्तीत बसण्याचा मान मिळत आहे.