माधवपुरा भागात तरुणावर प्राणघातक हल्ला

0

धुळे । शहरातील ग.नं.5 आणि 6 ची बोळ असलेल्या माधवपुरा भागात काल मध्यरात्री वाद उफाळून आला. यावेळी एका तरुणावर प्राणघातक हल्ला करण्यात आला असून जखमी तरुणाला आधी जिल्हा रुग्णालय व नंतर खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले आहे. तर जखमी तरुणाच्या तक्रारीवरुन तब्बल 16 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. माधवपुरा भागात रहाणार्‍या देवेश रामचंद्र साळुंके (वय-31) तरुणाने काल रात्री 11.30 च्या सुमारास ग.नं.5 येथील रामभाऊ दाढीवाला खुंट येथे उभ्या असलेल्या भोला वाघ यांच्यासह अन्य लोकांना तुम्ही माझ्या पत्नीला अश्‍लिल शब्द वापरून तीची छेड का काढतात? असे विचारले असता राग आलेल्या भोला वाघसह किशोर बाबुराव वाघ, मोहित किशोर वाघ, रामधिर वाघ, कुणाल फरताडे, रोहित किशोर वाघ, भावेश फरताडे, शुभम संजय वाघ, शुभमचा भाचा, बाळु ऊर्फ खंडेराव रमेश परभणे, गोविंद वाघ व अन्य 4 ते 5 जणांनी तलवार तसेच काठीने मारहाण केली.