माधव बहुउद्देशीय प्रतिष्ठानतर्फे डिजिटल पेमेंट विषयी कार्यशाळा

0

भुसावळ :  कॅशलेस व्यवहार करतांना कोणत्या अडचणी येतात तसेच घ्यावयाची काळजी यासंदर्भात माधव बहुउद्देशीय प्रतिष्ठान जळगाव व जैन सोशल गृप भुसावळच्या संयुक्तविद्यमाने रविवार दिनांक 8 रोजी सायंकाळी 8.15 वा. सुराणा साधना भवन, प्रोफेसर कॉलनी येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

देशातून काळा पैसा हद्दपार करण्यासाठी पंतप्रधान मोदींनी उचललेल्या विमुद्रीकरणाच्या धाडसी निर्णयानंतर काही ठिकाणी तात्पुरती चलन टंचाई निर्माण झाली. परंतु भ्रष्टाचारविरोधी या लढाईत सर्वचजण खंबीर उभे राहिले. चलन टंचाईवर मात करण्यासाठी शासनाने डिजीटल पेमेंट वर कार्यशाळा घेतल्या. डिजीटल नीती फाउंडेशन, मुंबईचे जयेश जोशी हे प्रात्याक्षिकासह मार्गदर्शन करणार आहे. तसेच उपस्थितांच्या शंकाचे निस्सारण करण्यात येणार आहे. या कार्यशाळेत मोबाईल व इंटरनेटव्दारे व्यवहारांचे विविध पर्याय,मोबाईल वॉलेट, युपीआय, इंटरनेट बँकिंग, ऑनलाईन व्यवहार करतांना घ्यावयाची काळजी यावर मार्गदर्शन केले जाणार आहे.उपस्थितीचे आवाहन करण्यात आले आहे.