माधुरी करणार मराठी चित्रपटांची निर्मिती

0

मुंबई : बॉलिवूडमध्ये यशस्वी कारकिर्द पार पाडलेली अभिनेत्री माधुरी दीक्षित आता एक नवी सुरुवात करत आहे. माधुरी अद्याप मराठी चित्रपटामध्ये अभिनेत्री म्हणून नाही तर निर्मातीच्या भूमिकेत पाऊल ठेवत आहे. तिचे पती श्रीराम नेने यांच्यासोबत ती मराठी चित्रपटांची निर्मिती करणार आहे. नुकतेच दोघांनी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाकडे चित्रपट निर्मिती संस्थेची नोंदणी केली आहे. माधुरी आणि डॉ. नेने यांच्या चित्रपट निर्मिती संस्थेचे नाव आरएनएम मुविंग पिक्चर्स प्रायव्हेट लिमिटेड असे आहे. या संस्थेने मराठी चित्रपट महामंडळाचे अधिकृत सभासदत्वासाठी निर्माता विभागात नोंदणी अर्ज दिला आहे.