पुणे-‘धक-धक गर्ल’ माधुरी दिक्षित पुण्यातून भाजपकडून निवडणूक लढवू शकतात असे गेल्या दोन दिवसांपासून सांगितले जात आहे. मात्र माधुरी दिक्षित लोकसभा निवडणूक लढविण्याबाबत कोणत्याही तयारीत नाही, तसेच त्यांचे नियोजन देखील नाही असे स्पष्टीकरण माधुरी दिक्षित यांच्या प्रवक्त्यांनी सांगितले आहे. माधुरी दिक्षित निवडणूक लढविणार ही केवळ अफवा आहे असे देखील प्रवक्त्यांनी सांगितले आहे.
संबंधित बातमी-माधुरी दीक्षितच्या नावामुळे पुण्याच्या राजकीय क्षेत्रात धमाल
१९८४ मध्ये माधुरी दिक्षित यांनी ‘बोध’चित्रपटाच्या माध्यमातून भारतीय चित्रपट सृष्टीत आल्या. कमी अवधीत त्यांनी खूप नावलौकिक मिळविले आहे.