माधुरी दीक्षित सुरु करणार डान्स चॅनेल

0

मुंबई : माधुरी दीक्षितला नृत्याची किती आवड आहे हे सर्वांनाच माहित आहे. माधुरी दिक्षितने आता नवीन नृत्य शिकणाऱ्या कलाकारांसाठी “लेट्‌स डान्स’ नावाचे चॅनेल सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या चॅनेलच्या माध्यमातून लोक आपल्या लिव्हींग रूममध्येच राहून डान्स शिकू शकतील, असा विश्‍वास तिला वाटतो आहे. त्यामुळे हे चॅनेल सुरू करण्याबाबत माधुरी खूपच एक्‍साईटेड आहे.

या चॅनेलवर विना जाहिरात सलग 150 तास डान्सचे 170 पेक्षा अधिक परफॉर्मन्स होणार आहेत. या चॅनेलवर माधुरीबरोबरच बॉलिवूडमधील अनेक डान्स मास्टर लोकांना डान्सचे मार्गदर्शन करणार आहेत. तिच्या या चॅनेलमुळे तरुणांना घरबसल्या डान्सच्या टिप्स मिळतील आणि नवीन कलाकार तयार होण्यास मदतही होईल.