माध्यमिक उच्च माध्यमिक विनाअनुदानित शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी , अंशदाअनुदानीत शिक्षकांच्या न्याय हक्काच्या मागणीसाठी शिक्षक समन्वय संघाच्या वतीने चाळीसगाव येथे आयोजित मेळाव्यात उपस्थिती लावली

माध्यमिक उच्च माध्यमिक विनाअनुदानित शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी , अंशदाअनुदानीत शिक्षकांच्या न्याय हक्काच्या मागणीसाठी शिक्षक समन्वय संघाच्या वतीने चाळीसगाव येथे आयोजित मेळाव्यात उपस्थिती लावली . संघाच्या मागणीला पाठिंबा दिला
विनाअनुदानित शिक्षकांच्या २० टक्के अनुदान तसेच ४० टक्के अनुदान मिळवून देण्याच्या यशस्वी आंदोलनात मी खारीचा वाटा उचलू शकलो होतो. या २०१९ आणि २०२० च्या आंदोलनाच्या आठणीना उजळा देत, सर्व शिक्षकांनी माझा जो गौरवपूर्चक उल्लेख केला. याचे मनस्वी समाधान आहे.

गेली २० वर्ष बिनपगारी नोकरी करत हे शिक्षक काम करत आहेत. त्यांच्या मागणीला यापूर्वीही सहकार्य केले आहे. यापुढेही १०० टक्के अनुदान मिळेपर्यंत त्यांच्या मागणीला सक्रिय सहकार्य राहिल.

प्रफुल्ल साळुंखे
चाळीसगाव विकास मंच