माध्यमिक शिक्षक संघातर्फे 15 ऑगस्ट रोजी सभेचे आयोजन

0

जळगाव । येथील माध्यमिक शिक्षक संघातर्फे 15 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजता जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक पतपेढीत सभा आयोजित करण्यात आली आहे. जिल्ह्यात 2 मे 2012 नंतर नियुक्त झालेल्या व शिक्षणाधिकार्‍याकडे सुनावणी झालेल्या शिक्षक-शिक्षकेतरांच्या मान्यतेबाबत प्रश्न निर्माण झाला आहे. यासंदर्भात चर्चासत्राद्वारे विचारविनिमय करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील माध्यमिक शाळांमध्ये 2 मे 2012 नंतर नियुक्त केलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारीपदी ज्यांची नियुक्ती झालेली आहे. यासह जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागातर्फे फेब्रुवारी 2017 मध्ये सुनावणी घेण्यात आलेल्या 105 शिक्षकांच्या मान्यता नियमित ठेवणेबाबत प्रश्न निर्माण झालेला आहे. तसेच इतर 90 शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांच्या मान्यतेबाबत देखील संबधित शिक्षकांचा खुलासा शिक्षण विभागाने मागविला होता.