मानधन न मिळाल्यास कामबंद आंदोलनाचा इशारा

0

पिंपळनेर । स्वयंपाकी व मदतनीस यांना मासिक मानधन वाढवून ते नियमित मिळणेबाबत आ. डी.एस.अहिरे यांना निवेदन देण्यात आले. केंद्र व महाराष्ट्र शासनाच्या संयुक्त विद्यमाने सन.2000 पासून शालेय स्तरावर मध्यांन्ह भोजन सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत आम्ही गेल्या आठ ते दहावर्षांपासून शासनाच्या अतिशय कमी मानधनावर (मासिक रू 1000) इमाने इतबारे काम करीत आहोत. परंतू, मिळणारे वेतन हे महागाईच्या परिस्थितीत फारच तोडके आहे. यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाहचा प्रश्‍न निर्माण होतो. तसेच मिळणारे मानधनही सहा सहा महिने मिळत नाही.

मानधनात वाढ करा
आमचे मासिक मानधन 1000 रू ऐवजी 3000 रू करुन तेही दरमहा नियमित मिळावे अन्यथा आम्ही कामबंद आंदोलन करु अशा आशयाचे निवेदन आ.अहिरे यांना येथील जिल्हा परिषद कन्या शाळेत देण्यात आले. निवेदनावर सुशिलाबाई अहिरे, उषा ओझरकर,शालिनी भामरे, ताराबाई गांगुर्डे,सुनंदाबाई गांगुर्डे, जागृती वानखेडे,चंद्रकला दुबे, अनिता पाटील,मिना पाटील, मनिषा चव्हाण आदींनी निवेदन देवुन मागणी केली.