जळगाव । गेल्या चार महिन्यापासून अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना मानधन देण्यात आलेले नाही, युनियन प्रतिनिधींना दर पंचवार्षीकला मानधन भत्यात वार्षीक वाढ सुचीत करण्यात आली होती ती देखील देण्यात आलेली नाही यांसह बचत गटांना दहा रुपये बालक खाद्य मिळावे, ताजा व सकस आहार मिळावा आदी मागणीसाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनतर्फे जिल्हा आयटक शाखेने स्थानिक व राज्यस्तरावरील मागण्यांसाठी जिल्हा परिषदेवर आंदोलन केले.
प्रतिनिधीेंनी केले चर्चा…
उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी फेबु्रवारी अखेरचे सर्व मानधन, आहार बीले मार्च अखेरपर्यत मिळतील, खातेबाह्य कामे करु नये, टी.ए.बीले सेवकांनी तयार करुन घेण्याचे शिकून घ्यावे आदी विषयांवर चर्चा घ्यावी. अंगणवाडी सेविकांचे प्रश्न 10 मार्च पर्यत मार्गी न लावल्यास लक्षणीय संप पुकारण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. आंदोलनात कॉ.अमृतराव महाजन, शशिकला निबांळकर, वत्सला पाटील, प्रेमलता पाटील, विद्या पाटील, मिना काटोले, सुनंदा पाटील, बचत गटाच्या जिजाबाई राणे, माया महाजन, गंगुबाई भोई यांनी सहभाग घेतला