जळगाव- मानवसेवा माध्यमिक विद्यालयात ‘सरीवर सरी’ हा पाऊस गाणींचा कार्यक्रम नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला़ या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका प्रतिभा सुर्यवंशी ह्या होत्या.
इयत्ता आठवी व दहावीच्या विद्यार्थ्यांनी बहारदार पाऊस गाणी सादर केली़ पाऊस आला़ वारा आला, धोय धोय पाऊस पडतोय रे़ यासह विविध गीतांमधून विद्यार्थ्यांनी निसर्गाचे वर्णन केले़ त्यात खुशबु शिरसाळे या विद्यार्थीनीने प्रथम क्रमांक पटकाविला़ सूत्रसंचालन रत्ना चोपडे यांनी तर आभार अनिता शिरसाठी यांनी मानले़
माहेश्वरी महिला मंडळातर्फे तीज सिंजारा
माहेश्वरी महिला मंडळातर्फे मंगळवार, २८ आॅगस्ट रोजी दुपारी ३ ते सायंकाळी ६ या दरम्यानात तीज सिंजारा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे़ हा कार्यक्रम बालविहार होणार आहे़ तसेच बजबारसच्या उद्यापनाची नावे मंगला सोमाणी व लिला मंडोरा यांच्याकडे कळवावी असे आवाहन उषा राठी, विणा मंडोरा व निता दहाड यांनी केले आहे़