तळेगाव : जीवितास धोका असल्याने मानवाधिकार संघटनेचे पुणे जिल्ह्याचे सरचिटणीस प्रदीप नाईक यांनी आपल्याला पोलिस संरक्षण देण्याची मागणी केली आहे. याबाबतचे लेखी निवेदन तळेगाव दाभाडे येथील वरिष्ठ पोलिस निरीक्षक मुकुट पाटील यांंना देण्यात आले आहे.
नाईक यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या आठ ते दहा दिवसांपासून माझ्या मागावर अज्ञात वाहने तसेच व्यक्ती फिरत आहे. यामुळे मला काम करणे कठीण झाले आहे. गेल्या पाच ते सहा वर्षांपासून समाजकार्यात सहभाग घेऊन वेगवेगळ्या गुन्ह्यांशी संबंधित त्या-त्या घटनांचा पाठपुरावा करून प्रशासनास सहकार्य करीत आहे. त्यामुळे मी करत असलेल्या कार्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस संरक्षण देण्यात यावे.