मानवास दिलेल्या अधिकाराचे रक्षण करणे महत्त्वाचे : अ‍ॅड. निकम

0

पुणे । सार्क नेशन्स इंटरनॅशनल ह्युमन राइट्स असोसिएशनचे कार्य खूप वाखाणण्याजोगे आहे. त्यांच्या प्रयत्नांनी अनेकांचे जीवन सुखकर झाले याचा मला आनंद होतो. मानवास दिलेल्या अधिकाराचे रक्षण कसे करावे, त्यासाठी समोर येणारी आव्हाने यांचा सामना कसा करावा, याबरोबरच भारतीय लोकशाहीची प्रेरणा घेऊनच असोसिएशन कार्य करत असल्याचे अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांनी सांगितले.डॉ मोहम्मद सईद म्हणाले, भारत देशाने जगाला नेहमीच नैतिक मूल्याचे शिक्षण दिले आहे, समानतेची प्रेरणा दिली आहे. प्रत्येक देशाच्या प्रत्येक नागरिकास स्वतंत्र व नैतिक अधिकाराने जगण्याचा अधिकार घटनेने दिलेला आहे. तो अधिकार प्रत्येकास मिळावा यासाठी सार्क नेशन्स इंटरनॅशनल ह्युमन राईट्स असोसिएशन कटिबद्ध आहे. या कार्यक्रमात सार्क नेशन्स इंटरनॅशनल ह्युमन राईट्स असोसिएशनचे कार्यकर्ते तसेच पुणे व अन्य शहरातून आलेले सामन्य नागरिकही उपस्थित होते.

जागतिक मानवाधिकार दिनाच्या पार्श्‍वभूमीवर सार्क नेशन्स इंटरनॅशनल ह्युमन राईट्स असोसिएशनतर्फे राष्ट्रीय संमेलनाचे आयोजन करण्यात आले. या संमेलनाचा उद्देश सार्क देश एकत्र येऊन संविधानाने मानवास दिलेल्या अधिकाराचे रक्षण कसे करावे, त्यासाठी समोर येणारी आव्हाने यांनाच सामना कसा करावा यावर प्रकाश टाकणे हा होता. याशिवाय नेशन्स इंटरनॅशनल ह्युमन राईट्स असोसिएशनचे कार्य लोकांपर्यंत पोहोचवणे जेणेकरून लोक त्यांना असलेल्या संविधानिक अधिकाराचा योग्य तो वापर करू शकतील.

मानवीहक्क वाहनाचे उद्घाटन
याप्रसंगी अ‍ॅड. निकम यांना त्यांनी केलेल्या कार्यासाठी राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला. यावेळी राज्यपाल डॉ विद्यासागर राव, राज्यसभेचे उपाध्यक्ष प्रा. पी जे कुरीअन व डॉ मोहम्मद सईद, अनिल म्हाळसकर, जॉर्जी कोचीपुराकाल, संतोष बागुल, डॉ प्रशांथ गाडीपे आदी उपस्थित होते. अ‍ॅड. निकम यांच्या हस्ते संतोष घोणे, हरिश्‍चंद्र गायकवाड, गोपाळराव गायकवाड यांचा सन्मान केला. मानवीहक्क वाहनाचे उद्घाटन करण्यात आले.