मुंबई । मानवी संवेदना जागृत करणारी नाटक ही अजरामर कला आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी मुंबईत केले. आठव्या थिएटर ऑलिम्पिकच्या सांगता सोहळ्यात मुख्यमंत्री बोलत होते.सध्याच्या काळात कृत्रिम भावभावना, आभासी जग म्हणजेआर्टिफिशियल इंटेलिजन्स वाढत असले तरीही नाटक ही कला अजरामर असल्याचे ते म्हणाले.
महाराष्ट्र आणि मुंबई ही भारतीय नाटयसृष्टीची जन्मभूमी असून मराठी रंगभूमीला जवळपास पावणे दोनशे वर्षांचा इतिहास आहे. राम गणेश गडकरी यांनी लिहिलेले ‘एकच प्याला’ हे नाटक शंभर वर्षे उलटली तरी आजही मराठी रसिकांच्या मनात आहे, असे ते म्हणाले. एल्फिस्टन येथील कामगार क्रिडा स्टेडिअममध्ये आयोजित आठव्या थिएटर ऑलिम्पिक्सच्या सांगता सोहळ्याते ते बोलत होते. केंद्रीय सांस्कृतिक राज्यमंत्री महेश शर्मा, अभिनेते नाना पाटेकर, नवाजउद्दीन सिद्दकी, आंतरराष्ट्रीय थिएटर ऑफ ऑलिम्पिक्स समितीचे अध्यक्ष आणि थिएटर ऑलिम्पिक्स संकल्पनेचे प्रणेते ग्रीक नाटय दिग्दर्शक थिओडोरस तेझरेपाऊलस, आंतरराष्ट्रीय थिएटर ऑफ ऑलिम्पिक्स समितीचे कार्यकारी सदस्य आणि मणिपूरचे विख्यात रंगकर्मी रतन थिय्याम, राष्ट्रीय नाटय विद्यालयाचे अध्यक्ष अर्जुन देवो चरण आणि राष्ट्रीय नाटय विद्यालयाचे संचालक वामन केंद्रे यावेळी उपस्थित होते.
राजकारणही एक रंगभूमी
राजकारणही एक रंगभूमी असून इथे कोणी खरे तर कोणी खोटे नाटक सादर करतात. मात्र मतदार खूप हुशार असून खोटया नाटकवाल्यांना ते बरोबर ओळखतात आणि खर्या नाटकवाल्यांनाच निवडून देतात, असेही फडणवीस यावेळी म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी नाना पाटेकरांचा उल्लेख आवर्जून आपल्या भआषणआत केला. थोडे खालच्या स्वरात बोला म्हणजे घसा खराब होणार नाही, असे ते मला नेहमी फोन करून सांगत असतात. आज मी त्यांच्या परीक्षेत पास झालो का? असे ते म्हणाले.