महिला शहराध्यक्षपदी किर्ती जाधव
पिंपरी-चिंचवड : मानवी हक्क संरक्षण आणि जागृती संघटनेच्या महाराष्ट्र संघटन सचिवपदी भोसरीतील उद्योजिका राजश्री गागरे यांची निवड करण्यात आली. तसेच पिंपरी-चिंचवड महिला शहराध्यक्षपदी किर्ती जाधव यांची नियुक्ती केली. संघटनेची राज्यस्तरीय बैठक पिंपळे सौदागर येथे रविवारी झाली. यामध्ये वर्षभराच्या कार्याचा आढावा घेण्यात आला. यानंतर सर्वानुमते गागरे यांच्या निवडीसह पुरूष, महिला व युवक या समितीची नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.
कार्यकारीणी अशी
पिंपरी चिंचवड महिला शहराध्यक्ष : किर्ती जाधव, उपाध्यक्ष नूतन शेळके, संघटन सचिव संजिवनी भालेराव, प्रसिद्धी अधिकारी चेतना जोशी. महाराष्ट्र : सचिव विद्या माळी, संघटन सचिव राजश्री गागरे, पश्चिम महाराष्ट्र महिला उपाध्यक्ष गूलशन नायकुडे, पश्चिम महाराष्ट्र महिला सचिव क्षमा धुमाळ. पुणे जिल्हा यूवक अध्यक्ष धनराज चौधरी, उपाध्यक्ष रियाज साहील शेख, सचिव पराग चौकडे, संघटन सचिव संदीप गायकवाड, कृष्णा कदम. पिंपरी चिंचवड शहर पुरुष समिती संघटन सचिव गजानन धाराशिवकर, कार्याध्यक्ष मूरलीधर दळवी, प्रसिद्धी अधिकारी पंडीत वनस्कर, प्रसिद्धी सचिव राहुल शेंडगे. याची निवड करण्यात आली. या निवडीवेळी संस्था अध्यक्ष विकास कूचेकर, उपाध्यक्ष डॉ. हरीदास अभिषेक, संचालक अण्णा जोगदंड, शहर उपाध्यक्ष विकास शहाणे, सचिव अरुण मुसळे, रोहीत शेळके, सौ संगिता जोगदंड आदी उपस्थित होते.