नवी दिल्ली : राजस्थान विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी भाजपाला मोठा झटका बसला आहे. भाजपचे माजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंग यांचा मुलगा आमदार मानवेंद्र सिंह यांनी बुधवारी पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला.
गेल्या महिन्यात बारमर येथे झालेल्या ‘स्वाभिमान रॅली’मध्ये आमदार मानवेंद्र सिंग यांनी भाजप सोडण्याचा निर्णय जाहीर केला होता. 2004 मध्ये लोकसभेचे खासदार असलेले सिंग हे 2013मध्ये भाजपच्या तिकिटावर शिव विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते. भाजपाबरोबर त्याचे मतभेद काही महिन्यांच्या आतच सुरू झाले होते. त्यांचे वडील जसवंत सिंग यांना भाजपने लोकसभेसाठी तिकीट नाकारले होते.