यावल। केंद्रीय मानव अधिकरांचे बळकटीकरणासह माहिलांचे सक्षामीकरण, बालमजुरी, भ्रष्ट्राचार, व्यसनमुक्ती, गरिबांचे हक्क व अधिकारासाठी संघटनेतर्फे काम केले जाईल. यासाठी जिल्हा, तालुका व ग्रामपातळीवर युवा व माहिला संघटन चळवळ उभी करणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम भारंबे यांनी दिली. तालुका खरेदी-विक्री संघाच्या सभागृहात पत्रकार परिषद घेण्यात आली. याप्रसंगी ते बोलत होते.
शिक्षणाच्या संधी मिळवून देणार
भारंबे म्हणाले की, सध्या सर्वत्र दारुच्या व्यसनामुळे गावपातळीवर अनेक महिलांचे संसार उध्वस्त होत आहेत शासकीय पातळीपर दारुबंदी यंत्रणा असूनही ती पारिणामकारक नसल्याची वस्तुस्थिती आहे. शिक्षणाच्या वयात घरातील अर्थिक परिस्थिती अभावी अनेक कुटुबातील मुले नाईलाजास्तव बालमजुरी करताहेत त्यामुळे या मुलांच्या पालकांना विश्वासात घेऊन मुलांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध करुन देणार असल्याचेही भारंबे यांनी स्पष्ट केले.
स्वामीनारायण मंदिराच्या संतांसह मान्यवरांची उपस्थिती
याप्रसंगी स्वामिनारायण मंदिराचे सदगुरु कोठारी स्वामी प्रेमप्रकाश दास, मंदिराचे सचिव डिगंबर जावळे, माणिक भिरुड, दिलीप महाजन, सुरेश सोनवणे उपस्थित होते. यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले.