मानव कल्याणाच्या व्यापकतेचा संस्कार

0

जळगाव । परमेश्‍वराला अपेक्षित मानव कल्याणाच्या वाटचालीतील संयम व शिस्तीचा संदेश अखिल मानव जातीला देणारा रमजान ईदचा सण सर्वत्र उत्साहात साजरा झाला. धर्मगुरुंच्या साक्षीणे पठण केली जाणारी रमजान ईदची नमाज हा संस्कारांचा अमुल्य ठेवा असल्याची श्रद्धा असल्याने मुस्लिम समुदयातील आबाल वृद्धांनी विविध ईदगाह मैदानावर नमाजसाठी गर्दी केली होती. समुदायातील शैक्षणिक, राजकीय, व्यावसायिक व विविध क्षेत्रातील नेतृत्व करणार्‍या मान्यवरांच्या नमाजमधील सहभागामुळे सर्व भेद गळून पडतात.

देशभरात जल्लोष
राज्यासह देशभर आज रमजान ईदचा जल्लोष होता. विविध ठिकाणी धर्मगुरुंनी नमाज पठणाच्या वेळी केलेल्या मार्गदर्शनात भारताच्या प्रगतीसाठी प्रत्यकाने आपली जबाबदारी निष्ठेने पार पाडावी याची जाणीव मार्गदर्शक संदेशांमधून सर्वांना करुन दिली. नैसर्गिक आपत्तीपासून अखिल मानव जातीचे रक्षण करावे व ही भूमी पुरेशा पावसात फळा, फुलांनी बहरावी अशी प्रार्थनाही परवरदिगार अल्लाहकडे नमाजमधून देशभरातील मुस्लिम
बांधवांनी केली.