पुणे । जिल्हा परिषदेसमोर थकीत पगार व ग्रामसेवक आणि पदाधिकार्यांकडून होणार्या मानसिक त्रासाविरुद्ध दाद मागण्यासाठी गेल्या दोन दिवसांपासून शिपाई लिंगप्पा दोरकर उपोषणासाठी बसले होते. मंगळवारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत विभागाचे संदीप कोहिनकर यांनी आश्वासन दिल्यांतर उपोषण मागे घेतले.
दरम्यान इंदापूर तालुक्यातील वकीलवस्तीतील ग्रामपंचायतीकडे लिपिक व शिपाई म्हणून २००४ सालापासून अनिल लिंगप्पा दोरकर हे काम करीत आहेत. ग्रामपंचातीचे सरपंच व पदाधिकरी बदलल्याने स्थानिक राजकारणामुळे जाणीवपूर्वक त्रास देऊन आर्थिक अडवणूक केल्याने त्यांची उपासमार होऊ लागल्याने दोरकर यांनी जिल्हा परिषदेसमोर उपोषणास बसले होते.
पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी कोहिनकर यांनी याबाबतची सरपंच, ग्रामसेवक आणि विस्तार अधिकार्यांची सुनावणी येत्या सोमवारी घेण्यात येणार आहे. संबंधित कर्मचारी दोरकर यांच्यावर अन्याय झाला असेल तर तो दूर करण्यात येणार असून योग्य तो निर्णय दिला जाईल असे आश्वासन कोहिनकर यांनी दिले त्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले आहे.