मानसोपचार तज्ज्ञाकडे जावं लागलं – वरुण धवन

0

मुंबई : वरूण धवनचा ‘बदलापूर’ चित्रपट चांगलाच गाजला होता. या चित्रपटापासून वरुणच्या करिअरला एक वेगळी कलाटणी मिळाली. या चित्रपटानंतर मला वारंवार मानसोपचार तज्ज्ञाकडे उपचारासाठी जावं लागलं असा खुलासा वरूणनं केला आहे. इफ्फीमध्ये वरुणनं हजेरी लावली त्यावेळी त्यानं आतापर्यंत न सांगितलेला अनुभव सांगितला.

या चित्रपटात रघुचं पात्र साकारताना मला वारंवार अस्वस्थ वाटत होतं. त्या पात्राचा माझ्या मनावरही खोल आणि नकारात्मक परिणाम होऊ लागला इतका की यातून बाहेर येण्यासाठी मला वारंवार मानसोपचार तज्ज्ञाकडे जावं लागलं होतं.