मानाची दहिहंडीची रक्कम केरळ पुरग्रस्तांना समर्पित

0

लोकनेते पप्पुदादा गुंजाळ सामाजिक प्रतिष्ठानचा स्तुत्य उपक्रम

चाळीसगाव – येथील लोकनेते स्व.पप्पुदादा गुंजाळ सामाजिक प्रतिष्ठान व मित्र मंडळाच्या वतीने सालाबादाप्रमाणे दहीहंडीचे आयोजन करुन मोठ्या प्रमाणावर बक्षीस ठेवले जाते. मात्र यावर्षी भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनाने देशाचे मोठं नुकसान झाले आहे. आणि केरळ येथे महाप्रलय आला त्यात लाखो लोक बेघर झालेत अनेकांचा मृत्यु झाला. म्हणुन लोकनेते स्व. पप्पु दादा गुंजाळ सामाजिक प्रतिष्ठान व मित्र मंडळाच्या वतीने सालाबादाप्रमाणे दहीहंडीचे आयोजन केले नाही व दहिहंडी उत्साहात साजरी न करता ठरावीक असलेले प्रथम बक्षीस 25 हजार 555 रुपयाची रक्कम केरळ पुरग्रस्तांसाठी मदत म्हणून धनादेश चाळीसगाव तहसीलदार कैलास देवरे यांना सोपविण्यात आला.

यांची होती उपस्थिती
यावेळी मित्र मंडळाचे राहुल पाटील, पवार गुरूजी, लक्ष्मण शिरसाठ, संतोष राजपूत, दिलीप घोरपडे, अमोल चौधरी सागर चौधरी, सुनिल जाधव, परशुराम पाटील, आकाश जाधव, सचिन फुलवारी, रोहीत जाधव, चेतन कुमावत, करण राठोड, बाळा राठोड, भिमराव जाधव, विवेक निकम, सोनु गवळे, गोविंद सोनवणे, संदीप जाधव, दिपक बारी, शुभम राठोड व लोकनेते पप्पुदादा गुंजाळ सामाजिक प्रतिष्ठाण चे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.