मानिवली येथे उल्हास नदीत 12 वर्षीय मुलगा बुडाला

0

कल्याण : टिटवाळा येथील मानिवली गावालगतून वाहणाऱ्या उल्हास नदीच्या पाण्यात पोहण्यासाठी गेलेल्या पाच मित्रां पैकी सादाब मुताईत शेख (12) हा मुलगा पाण्यात रविवारी बुडाला. टिटवाळा पोलीसांनी सोमवारी सकाळी अग्निशमन दलाला बोलवून घेऊन शोधाशोध केली असता 11 च्या सुमारास मृत्यू देह सापडला.

भायखळा आगरी पाडा येथून सहा मित्र टिटवाळा येथे राहणाऱ्या आपली नातेवाईक अजमेरी महमद अतित शेख हिच्याकडे आले होते. अजमेरीने नांदप येथे रूम घेतली असून त्या घराचे सामान शिफ्ट करणे व त्यानंतर पिकनिक करायची अशा दुहेरी उद्देशाने हे सगळे आले होते. सायंकाळी हे मानिवली येथील गणेश घाट (होडी नाका) येथे आंघोळीला गेले होते. पाच जन आंघोळी साठी उल्हास नदीच्या पात्रात उतरले. मात्र पाण्याचा प्रवाह वाढत असल्याने पाण्याचा अंदाज न आल्याने चौघे जन बुडू लागले. त्या पैकी एकाला पोहता येत असल्याने त्याने तिघांना कसे तरी बाहेर काढले मात्र त्यांना काढत असताना सादाब हा दुर वाहत गेला. तेथेच मच्छीमार बांधवांच्या मदतीने बरीच शोधा शोध केली, पण नदीचा प्रवाह जास्त असल्या कारणास्तव सादाब सापडला नाही. रात्री उशीरा अजमेरी शेख हीने टिटवाळा पोलीस ठाण्यात धाव घेऊन खबर दाखल करण्यात आली. पोलीसांनी घटनास्थळी जाऊन शोधले पण काही हाती लागले नाही. सोमवारी सकळी अग्निशामक दलाल पाचारण करण्यात आले आहे. सकाळी 11 च्या सुमारास सादाबचा मृत्यूदेह अग्निशामक दलाच्या हाती लागला.