मानेगाव शिवारातून दुचाकी लांबवली

The thieves stole the bike from Manegaon Shiwar मुक्ताईनगर : तालुक्यातील मानेगाव शिवारातून चोरट्यांनी 12 हजारांची दुचाकी लांबवली. या प्रकरणी मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

शेताजवळून लांबवली दुचाकी
तक्रारदार रमेश काशीनाथ चौधरी (72, कोथळी, ता.मुक्ताईनगर) यांच्या मालकिची दुचाकी (एम.एच.19 बी.सी.0997) ही मानेगाव शिवारातील शेत गट क्रमांक 156 येथे चांगदेव रस्त्यावर 16 रोजी सकाळी 10.30 उभी केल्यानंतर चोरट्यांनी संधी साधली. या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हवालदार अशोक जाधव करीत आहेत.