माने युवा मंचतर्फे गुणींचा सत्कार

0

पिंपरी : थेरगाव येथील अशोका सोसायटी येथे नरेंद्र माने युवा मंचाच्या वतीने क्रीडा, शिक्षण व साहित्या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मुला-मुलींचा सत्कार करण्यात आला. यामध्ये 19 वर्षाखालील गटामधून भारतीय क्रिकेट संघात निवड झालेला पवन शहा, पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश हुंबे, ग्रामीण भागातून शिक्षणासाठी पुण्यामधे येऊन 99.60 टक्के गुण मिळवलेल्या स्वप्नील नेताजी जावळे आणि 80 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवलेल्या आदित्य वलेकर, आदित्य एकशिगे, आदिती गुरवे, गौरी बनकर व बारावी मध्ये 90टक्के गुण मिळवणार्‍या अश्‍विनी दिलीप गडदे यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी ग प्रभागाचे अध्यक्ष बाबासाहेब त्रिभुवन, स्वीकृत नगरसेवक गोपाळ माळेकर. व्हेरॉक क्रिकेट अकैडमीचे कोचेस मोहन जाधव, विजय पाटील, चंदन गंगावणे, हुकूम शहा, एकनाथ मंजाळ, गोविंद वलेकर, गोविंद माने, विकास एकशिगे, भास्कर थोरे, जयंत जाधव, दिपक जाधव, दिलीप गडदे , पिटु काका आदी उपस्थित होते.