मान्यवरांसोबतच्या सेल्फिने भारावले भुसावळकर

0

भुसावळ:- सुदृढ आरोग्यासाठी जिल्हा पोलीस दलाने रविवारी आयोजित केलेल्या ‘रन भुसावळ रन’ स्पर्धेच्या समारोपानंतर आयोजकांनी उपस्थित असलेल्या मान्यवरांसोबत सेल्फि काढू देण्याची परवानगी दिल्यानंतर धावपटूंसह उपस्थितांमध्ये आनंदाची लहर पसरली. जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर, जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे, चाळीसगाव विभागाचे अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, भुसावळचे सहाय्यक पोलीस अधीक्षक नीलोत्पल, तालुक्याचे आमदार संजय सावकारे यांच्यासह डान्स महाराष्ट्र स्पर्धेतील स्पर्धक पवन टाक सोबत सेल्फि काढण्यासाठी मोठी गर्दी झाली होती शिवाय डी.एस.ग्राऊंडच्या पटांगणावर आयोजकांनी सेल्फि पॉईंट तयार केला होता. त्यात तीन, पाच व दहा किलोमीटर अंतर पार करणार्‍या स्पर्धकांसाठी विशेष प्लेक्स तयार करण्यात आल्यानंतर धावपटूंसह उपस्थितांनी तेथे सेल्फि काढण्याचा मनमुराद आनंद लूटला.

शहरातील पत्रकारांनीही नोंदवला सहभाग
भुसावळ मॅरेथॉनमध्ये शहरातील पत्रकारांनी काही अंतर धावून आपला सहभाग नोंदवला. त्यात दिव्य मराठीचे प्रतिनिधी हेमंत जोशी, श्रीकांत सराफ, सुनील वानखेडे, सकाळचे श्रीकांत जोशी, देशदूतचे प्रा.जगदीश पाटील, दैनिक जनशक्तीचे उपसंपादक गणेश वाघ, सामनाच्या उज्ज्वला बागुल यांचा समावेश होता.